रावेर दंगल : केरोसीन मिक्स डिझेल साठा जप्त

रावेर, प्रतिनिधी । रावेर दंगलीच्यां पाचव्या दिवशी पोलिसांनी केरोसीन मिक्स डिझेल साठा जप्त केला आहे. ही कारवाई दंगलीच्या पार्श्वभूमीवर शहरात सापडल्याने दंगल पूर्वनियोजित असल्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीससूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार असे की, रावेर दंगल होऊन आज पाच दिवस उलटले. शहरातील काही ठिकाणी एलसीबीने सर्च ऑपरेशन राबले असता एका मालवाहतुक गाडीमध्ये हा केरोसीन मिक्स डिझेल साठा जप्त करण्यात आला आहे. रावेर पोलिसांनी माल वाहतूक गाडी सह कॅरोसिन असा एकूण १ लाख ७७ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. यवढे मोठे केरोसीन मिक्स डिझेल रावेर शहरात कश्यासाठी आणले ? त्याचा वापर कुठे करणार होते ? या इतर प्रश्नांची रावेर पोलिस कसुन चौकशी करत आहे.

Protected Content