शेतीकामासाठी पैसे आणावे म्हणुन ममुराबाद येथील विवाहितेचा छळ

जळगाव प्रतिनिधी । हुंड्याचे कबूल केलेले पैसे ५० हजार रुपये तसेच शेतीकामासाठी माहेरुन आणावेत या मागणीसाठी जळगाव तालुक्यातील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणार्‍या  पतीसह सासरच्या ४ जणांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील रेखा गणेश सपकाळ वय ३० यांचा २००७ मध्ये टिटवी सावदबार ता. सोयगाव जि.औरंगाबाद येथील गणेश भिका सपकाळ यांच्याशी झाला. लग्नानंतर सहा ते सात महिने चांगले गेले. त्यानंतर रेखा हिने लग्नाच्या वेळी हुंड्यासाठी कबूल केलेले ५० हजार रुपये तसेच शेतीकामासाठी लागणारे पैसे माहेरुन आणावेत यासाठी पतीसह सासरच्यांनी शिवीगाळ करत मारहाण करत शारिरीक व मानसिक छळ केला. २६ मार्च २०२१ पर्यंत छळ सुरु होता. अखेर छळाला कंटाळून रेखा ही ममुराबाद येथे माहेरी आले. याप्रकरणी १ ऑगस्ट २०२१ रोजी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

Protected Content