ईलेक्ट्रिक खंब्यावरील तारांची चोरी; एमआयडीसीत गुन्हा

जळगाव प्रतिनिधी ।  तालुक्यातील पाथरी शिवारात महावितरण कंपनीच्या ईलक्ट्रिक खांबवरील ३५ हजार रूपये किंमतीच्या अल्यूमिनीअमच्या तारे तोडून चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील पाथरी शिवारातील गट नंबर १६५ चे जवळ असलेल्या शेतातील खंब्यावरील तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे पाथरी येथील शेतकरी सुका नेटके यांना १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता दिसून आले. नेटके यांनी लागलीच महावितरण कंपनीच्या ईलेक्ट्रिक सनीयर टेक्नीशीयन अकील लालखा मेवाती यांना संपर्क करून तारा चोरून लाईट गेल्याचे सांगितले. त्यानुसार अकील मेवाती हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुढील दहा खंब्यांपर्यंत पाहणी केली असतां अज्ञात चोरट्यांनी खंब्यांवरील सुमारे ३५ हजार रूपये किंमतीच्या अल्यूमिनीअमच्या तारा चोरून नेल्याचे समोर आले. याप्रकरणी सोमवारी १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी महावितरण कंपनीचे अधिकारी अकील मेवाती यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content