यावल येथे नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्याहस्ते पत्रकारांचा सत्कार

 

यावल प्रतिनिधी ।  यावल शहरातील नगरसेवक तथा आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांच्यातर्फे जागतिक पत्रकार दिनानिमित्त आई हॉस्पिटल येथे मंगळवारी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता शहरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

 

यावल नगर परिषदचे नगरसेवक तथा आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष व आई हॉस्पीटलचे संचालक डॉ कुंदन फेगडे यांच्या परिवाराच्या वतीने  आई हॉस्पीटल येथे  जगातीक पत्रकार दिनानिमित्ताने तालुक्यातील विविध वर्तमानपत्राचे अनेक वर्षापासुन वृत्त लेखाणाचे निष्पक्ष :पणे कार्यकरणाऱ्या प्रतिनिधींचा सत्काराचा घेण्यात आला.

 

याप्रसंगी डॉ . कुंदन फेगडे यांच्याहस्ते जेष्ठ पत्रकार डी.बी. पाटील, पत्रकार राजु कवडीवाले, पत्रकार अय्युब पटेल, पत्रकार शेखर पटेल, अरूण पाटील, सुनिल गावडे, ज्ञानदेव मराठे, पराग सराफ, तेजस यावलकर, शब्बीर खान, विक्की वानखेडे, दिपक नेवे, भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चौधरी आदी पत्रकारांचा सत्कार करण्यात आले. यावेळी डॉ . कुंदन फेगडे यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातुन ग्रामीण क्षेत्रात वृत्त लेखणीचे कार्य करीत असलेल्या पत्रकारांविषयी  आपले मनोगत व्यक्त करीत पत्रकारांच्या कार्याचा गौरव केला. या गौरव सोहळ्या कार्यक्रमा प्रसंगी भाजपाचे कार्यकर्ते परेश नाइक आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार डॉ . फेगडे यांचे संपर्क प्रमुख सागर लोहार यांनी मानले.

 

Protected Content