प्रसिध्द यूट्युबर रणवीर अल्लाहबादिया यांचे दोन्ही चॅनल्स हॅक

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | प्रसिद्ध भारतीय युट्युबर रणवीर अल्लाहबादिया वर सायबर अटॅक झाला आहे. त्याची दोन्ही युट्युब चॅनेल्स हॅक झाली असून सारे पॉडकास्ट डिलीट करण्यात आले आहेत. रणवीर अल्लाहबादिया हे त्याचे स्वतःचं चॅनेल आणि बीयर बायसेप्स या दोन्ही अकाऊंटची नावे बदलली आहे. ती बदलून टेस्ला करण्यात आल्याचे दिसत आहे. सोशल मीडीया युजर्सनी त्याचे स्क्रीन शॉर्ट्स देखील शेअर केले आहेत. दरम्यान रणवीरने त्याच्या इंस्टाग्राम वर स्टोरी पोस्ट करत या हॅक प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा माझ्या युट्युब करियरचा शेवट आहे का?’ असा सवाल त्याने विचारला आहे. रणवीरने २२ व्या वर्षी पहिलं युट्युब चॅनेल सुरू केले होते. त्याची ७ युट्युब चॅनेल्स आहेत. त्याच्या युट्युब चॅनेल्स वर १२ मिलियनच्या आसपास फॉलोवर्स आहेत.

रणवीरने 22 व्या वर्षी पहिलं युट्युब चॅनेल सुरू केलं होतं. त्याची ७ युट्युब चॅनेल्स आहेत. त्याच्या युट्युब चॅनेल्स वर १२ मिलियनच्या आसपास फॉलोवर्स आहेत. रणवीरने त्याच्या युट्युब करियरची सुरूवार स्वतःचा फीटनेसचा प्रवास डॉक्युमेंट करत केली. पदवीधर झाल्यानंतर त्याने बीयर बायसेप्स सुरू केले. त्यामध्येही फीटनेस आणि कुकिंग वर त्याचे व्हिडिओ होते. हळू हळू जसे चॅनेल मोठे झाले तसा तो मेन्स फॅशन, ग्रुमिंग कडे , मेंटल हेल्थ वर वळला. मागील काही महिन्यात त्याने अनेक सेलिब्रिटींसोबत पॉडकास्ट केले होते. २०२१ मध्ये तो पहिला स्वतंत्र क्रिएटर होता. ज्याने स्पोटीफाय सोबत पार्टानर झाला आणि तेथे त्याचा शो हा प्लॅटफॉर्मचा टॉप पॉडकास्ट होता.

Protected Content