मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पॅरासिटामॉलसह ५३ औषधे क्वालिटी टेस्टमध्ये फेल झाली आहेत. जीवनसत्त्वे, शुगर आणि रक्तदाबाच्या औषधांशिवाय प्रतिजैविकांचाही समावेश आहे. देशातील सर्वात मोठी औषध नियामक संस्था सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने त्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. सीएसडीएसओच्या यादीत व्हिटॅमिन सी आणि डी ३ टॅब्लेट शेल्कल, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी सॉफ्टजेल, अँटिआसिड पॅन-डी, पॅरासिटामोल गोळ्या आयपी ५००एमजी, मधुमेहावरील औषध ग्लिमेपिराइड आणि उच्च रक्तदाब औषध टेलमिसार्टन देखील क्वालिटी टेस्टमध्ये फेल झाले.
भारतच्या औषध नियमक संस्था काही प्रत्येक महिन्यात काही औषधांची तपासणी करतात. प्रत्येक महिन्यात होणाऱ्या रँडम सँपलिंगमध्ये यंदा व्हिटॅमिन सी आणि डी 3च्या टॅबलेट्स शेकल्स, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी सॉफ्टजेल, अँटीअॅसिड पॅन डी, पॅरासीटामोल आयपी ५०० एमजी, मधुमेहाचे औषध ग्लिमेपिराइड, उच्च रक्तदाबाचे औषध टेल्मिसर्टन सारख्या औषधांची निवड करण्यात आली होती. मात्र, दजा तपासणी चाचणीत ही औषध फेल ठरली आहेत. ड्रग कंटोलरने क्वालिटी टेस्टमध्ये फेल झालेल्या औषधांची यादी जाहीर केली आहे. यातील एका लिस्टमध्ये 48 औषधांची नावे असून दुसऱ्या लिस्टमध्ये पाच औषधांची नावं व औषध कंपन्यांचे उत्तरदेखील दिले आहे. औषध कंपन्यांनी याची जबाबदारी घेण्यास नकार दिला असून त्या औषधांना बनावट असल्याचे म्हटले आहे. मात्र, ही औषधं बनावट आहेत ती नाही याची चौकशी सुरू आहे.
ऑगस्ट महिन्यातही, सीडीएससीओने १५६ पेक्षा जास्त फिक्स्ड-डोज ड्रग कॉम्बिनेशन्स धोकादायक मानून त्यावर बंदी घातली होती. या औषधांमध्ये ताप, वेदना कमी करणाऱ्या आणि अॅलर्जीच्या गोळ्यांचा समावेश होता. पोटाच्या संसर्गासाठी दिले जाणारे मेट्रोनिडाझोल हे औषध हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेडने तयार केले आहे, तेही या चाचणीत अपयशी ठरले आहे. त्याचप्रमाणे टोरेंट फार्मास्युटिकल्सच्या शेलकल गोळ्याही चाचणीत अपयशी झाल्या.