जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अजिंठा चौकातील तैबा पान सेंटर दुकानाजवळ एमआयडीसी पोलीसांनी धडक कारवाई करत अवैधरित्या तंबाखू व तंबाखूजन्य सुगंधीत पान मसाला असा एकुण १ हजार ८२३ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अजिंठा चौकातील तैबा कोल्डींग पान टपरीजवळ बेकायदेशीर तंबाखू व तंबाखूजन्य सुगंधित पान मसालाची विक्री होत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मंगळवारी १४ जून रोजी मध्यरात्री १२.३० मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने धडक कारवाई करत संशयित आरोपी अल्तमेश शेख अकील रा. गणेशपुरी मेहरूण, जळगाव याला ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडून १ हजार ८२३ रूपये किंमतीचे गुटखा, सुगंधीत पानमसाला, आरएमडी पान मसाला, सिंगारेट असा मुद्देमाल आढळून आला. पोलीसांनी हा मुद्देमाल हस्तगत केला असून संशयिताला ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी मंगळवारी १४ जून रोजी सकाळी साडे चार वाजता पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अल्तमेश शेख अकील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.