किरकोळ कारणावरून तरूणाला विट मारून फेकले

एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सुप्रिम कॉलनीत किरकोळ कारणावरून तरूणाला शिवीगाळ करून डोक्यावर विट मारून फेकली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आकाश अशोक निमसे (वय-२४) रा. सुप्रीम कॉलनी हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी वाहनावर चालक म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवारी १३ जून रोजी रात्री ११ वाजता आकाश हा त्याचा मित्र प्रविण याला सोडण्यासाठी सुप्रिम कॉलनीतील प्रेमाबाई शाळेजवळ आला. त्यावेळी तिथे बसलेला प्रेमचंद भोई म्हणाला की, तू इथे का आला. त्यावर मी मित्राला सोडण्यासाठी आलो असल्याचे आकाशने सांगितले. याचा राग आल्याने प्रेमचंद भोई, बाळू जैन दोन्ही रा. सुप्रीम कॉलनी जळगाव यांनी शिवीगाळ करून मारहाण केली तर एकाने आकाशच्या डोक्यावर विट मारून गंभीर दुखापत केली. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याबाबत आकाशच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रेमचंद भोई आणि बाळू जैन दोन्ही रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन पाटील करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!