चोरीची कबुली देताच पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेतल्या

भडगाव – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | कडबा कुट्टीच्या चोरी प्रकरणात गुढे गावातील काही संशयितांवर संशय येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता दुचाकीही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. यावर पोलिसांनी तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

तालुक्यातील गुढे येथील शेतकरी दिलीप देवीदास पाटील यांच्या शेतातून कडबा कुट्टीची मोटार चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी भडगाव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले होते. मात्र गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरली. यात गावातील काही जण असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावर पोलिसांनी गुढे गावातील अनिल ज्ञानेश्वर चव्हाण, प्रदिप रणजित कोळी, संतोष नाना महाले व समाधान संतोष ढोले रा. बहाळ ता. चाळीसगांव अशांना ताब्यात घेतले. अटकेमध्ये दिलीप देवीदास पाटील रा. गुढे ता. भडगांव यांची चोरीस गेलेली मोटार पोलीसांना मिळुन आली. सदर आरोपीकडे आणखी तपास करत असताना गुढे गावातील आणखी काही संशयितांकडे चोरीच्या मोटार सायकल असल्याची बातमी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना मिळाली. त्यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, सफौ पांडुरंग सोनवणे, पोना निलेश ब्राम्हणकर, पोना एकनाथ पाटील यांनी मिळालेल्या बातमीवरुन गुढे गावातील संशयित इसम भुषण (प्रशांत) ज्ञानेश्वर महाजन, भुषण अनिल भावसार, सर्व रा. गुढे ता भडगांव यांचेकडे मोटार सायकलच्या गुन्हयांची चौकशी केली असता त्यांनी अटकेत असलेला संतोष नाना महाले याचेसह मिळुन नाशिक, चाळीसगांव येथे मोटार सायकलची चोरी केली असल्याचे कबुली दिली. व चोरलेल्या मोटार सायकल ज्यात एक होंडा कंपनीची युनिकॉर्न व दोन बजाज प्लाटीना अशा मोटार सायकल पोलिसांना सुपूर्द केल्या.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली भडगांव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, सफौ पांडुरंग सोनवणे, पोना/निलेश ब्राम्हणकर, पोना एकनाथ पाटील यांनी केली आहे. पुढील तपास पोना एकनाथ पाटील हे करीत आहे.

Protected Content