कंटेनरच्याा धडकेत ग्रामपंचायत कर्मचारी ठार

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरने दिलेल्या धडकेत ग्रामपंचायत कर्मचारी ठार झाल्याची घटना आज घडली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली-घोडसगाव ग्रामपंचायतीमध्ये जितेंद्र रवींद्र वाघ (वय ३०, रा. चिखली ) हे पाणी पुरवठा शिपाई म्हणून कार्यरत होते. आज सकाळी ते मुक्ताईनगरकडून आपल्या गावाकडे निघाले असतांना खडसे फार्म हाऊसच्या समोरच्या उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीला कंटेनरने धडक दिली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर, कंटेनरने धडक दिल्यानंतर चालकाने वाहनासह घटनास्थळावून पलायन केल्याचे वृत्त असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content