छात्रभारतीतर्फे विद्यार्थ्यांनी एमपीएससी परिक्षेबाबत मार्गदर्शन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एम.पी.एस.सी.) मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत पाचोरा येथील भुषण युवराज पाटील यांची पी. एस. आय. पदी तसेच भडगाव येथील सिमा राजेंद्र शिरसाठ यांची मंत्रालयीन क्लार्क व टॅक्स असिस्टंट पदी निवड झाली आहे. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे भुषण पाटील व सीमा शिरसाठ यांचा येथील हुतात्मा स्मारकात सत्कार करण्यात आला. तसेच पाचोरा नगरपरिषद च्या लायब्ररी मधील जे विद्यार्थी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत आहेत व तालुक्यातील इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी, यशवंताचे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. कार्यक्रमाचा सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाभ घेतला व त्यांचा अनेक शंका सोडवून घेतल्या. यावेळी छात्रभारतीचे पदाधिकारी संदिप जाधव, ज्योती पाटील, सायली पाटील, भुषण पाटील, चंचल सोनवणे, राहुल परदेशी, राहुल पाटील उपस्थित होते.

Protected Content