मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथे गुरू रविदास जी जयंती चर्मकार समाजाच्या वतीने गुरू रविदास जी यांची ६४५ वी जयंती प्रतिमेला माल्यार्पण करून साजरी करण्यात आली.
गुरू रविदास जी चि आज 645 वि जयंती चर्मकार समाजाच्या गुरू रविदास नगर येथे साजरी करण्यात आली. आज 27 फेब्रुवारी 2021 रोजी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गुरू रविदास जी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रसंगी समाजाचे प्रतिष्ठित, जेष्ठ, महिला, लहान बालगोपाळ कोरोनाचे नियम पाळून, मास्क लावून उपस्थित होते.