औरंगाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावरून पलटवार केला आहे.
ना. गुलाबराव पाटील यांनी अलीकडेच आदित्य ठाकरे हे गोधडीत असल्यापासून आपण शिवसैनिक असल्याचे वक्तव्य केले होते. यावर माजी खासदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, गुलाबराव पाटलांनी खोके मिळायला लागले की तो आदित्य ठाकरेंवर बोलतोे. पण मी त्याची गोधडी काढल्याशिवाय राहणार नाही. मला राग आला तर मी काहीही करू शकतो, असे वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.
दरम्यान, याप्रसंगी चंद्रकांत खैरे यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका करताना खैरे म्हणाले की, सिगारेट ओढत फोटो काढणार्या महिलेने आम्हाला काही शिकवू नये, त्यांचे कपडे कसे असतात हे सर्व जनतेला माहिती आहे. त्या बाईंनी आम्हाला हनुमंताची आणि रामाची भक्ती शिकवू नये असा इशारा देखील खैरे यांनी दिला आहे.