…याचा नाथाभाऊंनाही आनंद होईल ! : ना. गुलाबराव पाटील

मुंबई प्रतिनिधी । मुक्ताईनगरातील भाजपच्या नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश झाला असून याचा नाथाभाऊंनाही आनंद होईल अशी प्रतिक्रिया राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. मुक्ताईनगरच्या नगरसेवकांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज मातोश्रीवर मुक्ताईनगर नगरपंचायतीतील भाजपच्या दहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश निश्‍चीत झाला आहे. https://livetrends.news आज सायंकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत या सर्वांना शिवबंधन बांधण्यात आले. याप्रसंगी गटनेता पियुष मोरे यांच्यासह मुकेश वानखेडे, संतोष कोळी,बिलकीसबी अमानुल्ला खान, नुसरतबी मेहबूब खान व शबानाबी अब्दुल आरिफ यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. तर चार नगरसेवक उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, शिवबंधन सोहळा पार पाडल्यानंतर ना. गुलाबराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. https://livetrends.news ते म्हणाले की, मुक्ताईनगरातील १७ नगरसेवकांपैकी आता १३ नगरसेवक हे शिवसेनेचे झाले असून येथे शिवसेनेचा भगवा फडकल्याचा आपल्याला मनस्वी आनंद आहे. हा धक्का भाजपला की खडसेंना ? अशी विचारणा केली असता ना. पाटील म्हणाले की, हे सर्व नगरसेवक खडसे यांचे समर्थक असले तरी ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. यामुळे ते भाजपचा त्याग करून शिवसेनेत आले असल्याचा धक्का कुणाला बसला हे तुम्हाला समजायचे ते समजा…मात्र या प्रवेशाचा नाथाभाऊंना आनंद झाला असेल असे ते म्हणाले.

नाथाभाऊ हे भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर आम्ही त्यांचे खुल्या दिलाने स्वागत केले होते. https://livetrends.news याच प्रमाणे या नगरसेवकांच्या पक्षांतराचे ते देखील स्वागत करतील अशी अपेक्षा असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले. हे सर्व नगरसेवक महाविकास आघाडीच्या प्रवाहातच आले असल्याचे प्रतिपादन देखील ना. पाटील यांनी केले.

Protected Content