शिवसेना शिंदे गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत गुलाबराव पाटील

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी शिवसेना शिंदे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात शिवसेना प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावांसह या यादीत ४० नेत्यांची नावांचा समावेश आहे. त्यात जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे. गुलाबराव पाटील हे शिवसेनेसोबत एकनिष्ठ असलेले नेते आहे. ते सुरूवातीपासूनच शिवसेनेसोबतच आहे.

याव्यतिरिक्त या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रफुल्ल पटेल आदींचा समावेश आहे.

Protected Content