एमआयडीसीत टेंट हाऊसच्या गोदामास आग; २० लाखांचे नुकसान (व्हिडिओ )

 

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी सेक्टरमधील एका टेंट हाऊसच्या गोदामास रविवारी सकाळी आग लागलेल्या आगीत सुमारे २० लाख रूपयांचा मुद्देमालाचे साहित्य जळुन खाक झाले आहे.  या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, वैभव नरेश परदेशी (रा. टागोरनगर) यांच्या मालकीचे जय अंबे टेंट हाऊस टागोरनगरात आहे. या टेंट हाऊसचे गादाम एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये आहे. दरम्यान, रविवारी सकाळी १०.१५ वाजता गोदामातून अचानकपणे धुर निघत असल्याचे सुरक्षारक्षक सुधाकर साबळे याच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच गोदामाकडे धाव घेतली असता आतमध्ये आग लागल्याचे निष्पन्न झाले. साबळे यांनी शेजारील कंपनीमधील कामगारांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. यानंतर अग्निशामक विभागास माहिती देण्यात आली. दोन बंद घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सुमारे एक तासात आगीवर पुर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले.  या आगीत गोदामातील ५०० खुर्चा,२० कुलर, ६ महाराजा सोफा, २ महाराजा स्टेज, ४०० सिलींग, ३०० मॅटींग, ८ महाराजा खुर्ची व मंडप व किरकोळ सामान असे सुमारे २० लाख रुपयांचे साहित्य जळुन खाक झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/451533469360914

 

Protected Content