चंद्रशेखर अत्तरदे यांचा गंगापुरी येथे धडाक्यात प्रचार

WhatsApp Image 2019 10 09 at 9.53.17 PM

धरणगाव, प्रतिनिधी | जळगाव ग्रामीण मतदार संघातील भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांनी आज (दि.९) गंगापुरी येथे प्रचारदौरा केला. त्यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्याचा आजची सांगता आज गंगापुरी येथे करण्यात आली. गावातील महिलांनी अत्तरदे यांचे औक्षण करून तसेच पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले व त्यांच्या विजयासाठी देवाला साकडेही घातले.

धरणगाव तालुक्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी तसेच गंगापुरी गावचे सरपंच, ग्रा. प. सदस्य, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दौऱ्याप्रसंगी जुनिअर मकरंद अनासपुरे, उपाध्यक्ष पी. सी. आबा पाटील, भाजपा ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे ,, भाजपा तालुका अध्यक्ष संजय महाजन , भाजपा शहर अध्यक्ष सुनिल वाणी , भाजपा तालुका सरचिटणीस सुनिल चौधरी , धरणगाव येथील नगरसेवक गुलाब मराठे, ललित येवले, कैलास माळी सर्, सचिन पाटील, कांतीलाल माळी, भालचंद्र माळी, शरद आन्ना, राजेंद्र येवले, शिरीष आन्ना, शेखर पाटील, कन्हैय्या रायपूरकर, सरपंच, बांभोरी तथा तालुका सरचिटणीस राकेश नन्नवरे , सोनवद सरपंच निर्दोष पाटील यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content