आपच्या खासदार आणि आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे तुरूंगात आहे. त्यांना दारू घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केली आहे. हे सुरू असताना त्यांना भाजपने धक्का दिला. पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या खासदार आणि आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंजाबमधील जालंधरचे आप खासदार सुशील कुमार रिंकू आणि जालंधर पश्चिमचे आप आमदार शीतल अंगूराम यांनी भाजपमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागा आहेत. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणूक तोडांवर असताना आपला मोठा झटका बसला आहे.

भाजप पंजाबमधून स्वबळावर निवडणूक लढत आहे. आप आणि काँग्रेसचीही राज्यात आघाडी झालेली नाही. सुशीलकुमार रिंकू यांनी आपने लोकसभेची उमेदवारी दिली असताना ही त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते काँग्रेसचे माजी आमदार होते. त्यांनी एप्रिल २०२३ मध्ये आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. जालंधरमध्ये २०२३ मध्ये पोटनिवडणूक झाली होती. त्यांना या जालंधरमधील पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत ते विजयी होऊन संसदेत गेले होते. आता सुशील कुमार हे भाजपमध्ये गेल्याने ते भाजपच्या तिकीटावर लढणार आहेत.

Protected Content