धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील आदर्श मतदान केंद्रात जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी १३ मे रोजी सकाळी ११ वाजता आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. दुपारी १ वाजेपर्यंत जळगाव ग्राणीन मतदार संघातून ३४.९३ टक्के झाले आहे.
जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघातून दोन खासदार निवडून देण्यासाठी आज जळगाव जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. जळगाव लोकसभा अंतर्गत असलेल्या जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणागाव तालुक्यातील पाळधी येथील मतदात केंद्रात जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील सोमवारी १३ मे रोजी सकाळी ११ वाजता आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जनतेला मतदान करण्याबाबत आवाहन केले आहे.ते म्हणाले की, मी मतदान केले आहे. तुम्ही देखील मतदान करा, मतदानाच्या द्वारे आपल्या देशाचा राजा निवडून देतो. पुर्वी राजाच्या पोटी राजा जन्माला यायचा आता मतदाराच्या मतदान पेटीतून राजा जन्माला येणार असल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.