धरणगाव येथील पी. आर. हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात 

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सन – १९७५ मध्ये देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या आठवणींना उजाळा देत धरणगाव येथील येथील पी. आर. हायस्कूलमध्ये शिकलेले माजी विद्यार्थी विद्यार्थिनी तब्बल ४७ वर्षांना एकत्र आले.

वेगवेगळ्या समाजातील क्षेत्रात कार्यरत असलेल्या या मित्र मैत्रिणींनी आपल्या तत्कालीन गुरुवर्यांचा देखील या निमित्ताने सन्मान केला. येथील पी. आर. हायस्कूलमध्ये सन – १९७५ मध्ये दहावीत शिकणारे व आज इंजिनियर, डॉक्टर, राजकीय पक्षांचे नेते, वकील, प्राध्यापक अशा विविध पदांवर कार्यरत असलेले मित्र- मैत्रिणी या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. आपले वय, भान हरपून संपूर्ण दिवस सर्वांनी घालवला. या सर्वांनी आणीबाणीचा काळ अनुभवलेला असल्याने त्याकाळच्या आठवणींना उजाळा देत अनेकांना गहिवरले.

या स्नेहमेळ्याचे उद्घाटन किर्गिझस्तानचे राजनैतिक अधिकारी डॉ. देवेंद्र साळी यांच्याहस्ते झाले. प्रा. रमेश महाजन अध्यक्षस्थानी होते. बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डी. आर. पाटील, पी. आर. हायस्कूलचे सचिव डॉ. मिलिंद डहाळे, प्रदेश काँग्रेसचे सचिव डी. जी. पाटील, अॅड. मोहन शुक्ला आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी गुरुवर्य शि. गो. वाजपेयी, माजी मुख्याध्यापक तथा पी. आर. हायस्कूल सोसायटीचे उपाध्यक्ष व्ही.टी. गालापुरे यांचा सर्वांनी गौरव केला. दुपारच्या सत्रात सर्वांनी गाणी, कविता सादर करीत प्रत्यक्षात ज्या वर्गात हे

विद्यार्थी शिकत होते. त्या वर्गात बसून आठवणींना उजाळा दिला. शेवटी सर्वांनी ग्रुप फोटो काढला. अॅड. मोहन शुक्ला यांनी फ्रेम करून तो प्रत्येकाला‌ भेट दिला. अॅड. शुक्लांसह काँग्रेसचे प्रदेश सचिव दिलीप पाटील, डॉ. मिलिंद डहाळे, डॉ. मनोज देशपांडे व अनुराग वाजपेयी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

डॉ. मनोज देशपांडे, अनुराग वाजपेयी, प्रा. संजय शहा, सुरेखा शहा, चिंतामण कुळकर्णी, विजय जाधव, विजय साकरे, दिलीप बोरसे, एकनाथ खैरनार, आशा काबरे, वीणा कर्ता, निलीमा गौतमे, किरणकांता पगारीया, साधना काबरा, निर्मला पाटील, राजेंद्र पाटील, संजय पांडे, माधव पाटील, संजय पांडे, अन्वर बोहरी, अन्वर पठाण, सुभाष पाटील, विजय झुंझारराव, राजेश शहा, शैलेश शहा, मधुकर पाटील, प्रकाश असर, परेश जैन, ज्ञानेश्वर पाटील, सुधाकर शुक्ला, नारायण पाटील, मिलिंद कोचुरे, निवृत्ती साळुंखे, राजेंद्र काबरा आदी उपस्थित होते.

Protected Content