यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मोहराळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयतर्फे शहिद दिनानिमित्त देशाचे क्रांतीवीर शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू आणि शहीद सुखदेव यांना भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी सर्वप्रथम मोहराळे बसस्टॅन्ड समोरील चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शहीद दिन निमित्ता शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला देवा अडकमोल, सुनिल सोनवणे , संदीप झाल्टे, मिलिंद अडकमोल, सचिन अडकमोल, हिरालाल कोळी , दिपक अडकमोल, विनोद अडकमोल, हर्षल अडकमोल, आयुष अडकमोल, गौत्तम सोनवणे , सतिष अडकमोल, कुणाल अडकमोल आदी युवा कार्यकर्त्यांनी व सभासदांनी यावेळी उपस्थित राहुन पुष्पहार व मेणबत्ती लावून शहीदांना आदरांजली वाहीली.
या प्रसंगी युवकांच्या माध्यमातुन क्रांतीवीर शहीद सुखदेव, शहीद राजगुरू यांच्या क्रांतीचा उजाडा देत, देशासाठी केलेल्या बलीदानाच्या आठवणींना उजाळा देतांना त्यांना वयाच्या २८ वर्षं ८महिने ह्या वयात ब्रिटिश सम्राज्यविरुद्धच्या लढ्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती अशी माहिती देण्यात आली.