मराठा आरक्षण संदर्भात व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या तरूणावर कारवाईची मागणी

यावल प्रतिनिधी । मराठा आरक्षण नुकतेच सर्वोच्च न्यायालयातर्फे रद्द करण्यात आले असून याप्रकरणी सोशल मिडियातून या निर्णयाच्या निषेधात विविध प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, एका अज्ञान तरुणाने आरक्षण उपभोगणाऱ्यांच्या भावना दुखविल्या जातील, असा व्हिडीओ व्हायरल केला आहे. यासंदर्भात मागासवर्गीस समाज बांधवांनी पोलीसात धाव घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलिसात देण्यात आलेल्या तक्रारी नुसार  शहरातील देशमुख वाडा भागातील रहिवासी हेमंत बडगुजर या तरुणाने मोबाईल वर आरक्षणाच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला. आणि त्यामुळे इतर आरक्षण उपभोगणाऱ्या समाजाच्या भावना दुखावल्या आहे. आरक्षण उपभोगणाऱ्या संर्दभात त्याने केलेल्या वक्तव्या मुळे सामाजीक भावना दुखावल्या व समाजातील अनेक तरूण संतप्त झाले आहेत तेव्हा त्याच्या अशा या व्हायरल व्हीडीओ मुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेला तडा जावु शकतो म्हणुन संबधीतावर तात्काळ कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्याकडे एका तक्रारी द्वारे करण्यात आली आहे. 

संबधीत तरुणाविरुद्ध तात्काळ कारवाई न झाल्यास समाज बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. सदर प्रसंगी अनिल जंजाळे, विलास भास्कर, विकी गजरे, स्वप्नील पारधे, प्रमोद पारधे, बबलू गजरे, शशिकांत तायडे, निलेश सपकाळे आदी समाज बांधव प्रामुख्याने उपस्थिती होते .

Protected Content