रांजणगाव येथील दिव्यांग मुलीला मदतीचा हात

चाळीसगाव, प्रतिनिधी । सामाजिक भावनेतून सागर पुराणिक यांनी दिव्यांग मुलीसाठी किराणाचे माल उपलब्ध करून दिल्याने ते तालुक्यातील रांजणगाव येथील अंध मुलीला सामाजिक कार्यकर्त्यांकडून वितरीत करण्यात आले. 

समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या सामाजिक जाणिवेतून सागर पुराणिक (रा. पुणे) हा  सतत अंध, अपंग व अनाथ मुलांसाठी तत्परता दाखवून मदतीचा हात पुढे करत असतो. दरम्यान देवेश पवार यांनी चाळीसगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांना मतद करावी असे आवाहन केले होते. या आवाहनाची दखल घेऊन सागर पुराणिक यांनी किराणाचे माल उपलब्ध करून दिल्याने साप्ताहिक वंचितांचा प्रतिनिधीचे संपादक योगेश राठोड व देवेश पवार यांनी तालुक्यातील रांजणगाव येथील अंध तरूणी हिना अन्सार पठाण हिला किराणाचे माल सुपूर्द  केले. त्यामुळे आजही माणूसकी जिवंत असल्याचे प्रत्यय यावेळी दिसून आले. अशाच प्रकारे मिळालेली मदत हि योगेश राठोड व देवेश पवार यांच्या मार्फत गरजवंतापर्यंत पोहोचली जात असल्याने याबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

 

Protected Content