मेहरूण, पिंप्राळा आणि निमखेडी परिसरात तीन नवी लसीकरण केंद्रे सुरू करणार; उपमहापौर कुलभूषण पाटील यांची माहिती

जळगाव प्रतिनिधी । शहरात कोरोना लसीकरणासाठी मेहरूण, पिंप्राळा आणि निमखेडी परिसरात अशी तीन केंद्रे जिल्हा प्रशासनाकडून वाढविली जाणार आहे. यासाठी जागांची पाहणी लगेच म्हणजे उद्या शनीवारी ८ मे रोजी स्वत: जिल्हाधिकारी अभिजीत राऊत करणार अशी माहिती उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिली.

 

सध्याच्या कोरोना लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी आणि जेष्ठ नागरीकांना होणारा त्रास लक्षात घेवून उपमहापौर कुलभूषण पाटील व महापालिका आयुक्त सतिश कुळकर्णी यांनी आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी चर्चा केली. आणि तपसीलवार माहिती देणारे निवेदन उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या चर्चेच्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ही समस्या वेळ वाया न घालवता मार्गी लावण्याची मागणी तात्काळ मान्य केली. आणि मेहरूण, पिंप्राळा आणि निमखेडी परिसरात अशी तीन केंद्रे वाढविण्याचे जिल्हाधिकारी यांनी मान्य केले. या नव्या लसीकरण केंद्रासाठी स्वत: जिल्हाधिकारी उद्या शनीवारी जागांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर त्यासाठी लागणारे कर्मचारी नेमून शक्य तेवढ्या लवकर नव्या लसीकरण केंद्रांचे काम सुरू केले जाणार आहे. यावेळी सर्वच लसीकरण केंद्रांवर जेष्ठ नागरीकांसाठी खूर्च्या, सावली, पिण्याचे पाणी या सुविधा दिल्या जाव्यात अशी मागणी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी या चर्चेत केली होती. त्याचा विचारही जिल्हा प्रशासनाकडून केला जाणार आहे.

Protected Content