भुसावळच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देवर्षी घोषाल याची उचलबांगडी

 

 

भुसावळ प्रतिनिधी । येथील ग्रामीण रूग्णालयाचे प्रमुख अधिकारी तसेच प्रमुख नोडल अधिकारी डॉ. देवर्षी घोषाल यांच्याकडील प्रभार काढण्यात आला असून त्यांना त्यांची नियुक्ती असणार्‍या वरणगाव येथे परत पाठविण्यात आले आहे. भाजप वैद्यकीय आघाडीच्या पाठपुराव्याने त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

, वरणगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. देवर्षी घोषाल यांच्याकडे भुसावळच्या ग्रामीण रूग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारीपदाची धुरा सोपविण्यात आली होती. ते कोविडसाठीचे प्रमुख नोडल अधिकारी देखील होते.
दरम्यान, ग्रामीण रूग्णालयात सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्या तरी त्या प्रमाणात रूग्णांची सोय होत नव्हती. याची दखल घेऊन भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी पाठपुरावा सुरू केला होता. यात कोविड रूग्णांच्या तपासणीचे सँपल पाच दिवस पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. तर नंतर, या रूग्णालयात नॉन-कोविड रूग्णांना उपचार मिळत नव्हते. याबाबत डॉ. नि. तु. पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रारी केल्या होत्या.

या तक्रारींची दखल घेऊन डॉ. देवर्षी घोषाल यांच्याकडील ग्रामीण रूग्णालयाचे प्रमुख अधिकारी तसेच प्रमुख नोडल अधिकारी या पदांचा प्रभार काढण्यात आला असून त्यांना त्यांची नियुक्ती असणार्‍या वरणगाव येथे परत पाठविण्यात आले आहे.

या संदर्भात पाठपुरावा करणारे भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि.तु. पाटील म्हणाले की, महामार्गावर असलेल्या ट्रॉमा केअर सेन्टर हे पुन्हा नॉन कॉविड रुग्णांसाठी सुरू झाल्याने आनंद आहे. आता पुढील काळात शवविच्छेदन आणि इतर सुविधांसाठी पाठपुरावा करू.
तसेच तुम्हाला सरकारी वैद्यकीय क्षेत्रातील नोकरी लाऊन देतो, म्हणून बेरोजगारांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याची चर्चा आहे. त्यासंबंधी संबंधित अधिकारी वर्गाशी बोलून चौकशी करण्याची मागणी करणार असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली आहे.

Protected Content