अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने थोर समाज सुधारक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना साईबाबा सार्वजनिक वाचनालयात अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात सुरुवातीला प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एस ओ माळी व उपनगराध्यक्ष सुधाकर महाजन यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी समता परिषदेचे तालुकाध्यक्ष अमोल माळी,भा.ज.यु.मो चे ता.उपाध्यक्ष राहुल पाटील, सामाजिक कार्यकर्ते समाधान पाटील, महेंद्र महाजन, विमलबाई कोळी, ग्रंथपाल संगीता पाटील, शोभाबाई पाटील, रामचंद्र खेमोत, अमरखा पठाण, हरी पाटील, छोटु मिस्तरी, भिका ठाकुर, मनोहर मराठे, नारायण खेमोत आदी.उपस्थित होते.