अनुकंपाधारकांच्या उपोषणाची महापौर जयश्री महाजन यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर सांगता(व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अनुकंपा नियुक्ती मिळावी यासाठी जळगाव महापालिकेसमोर ७ मार्च पासून अनुकंपधारकांनी आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली होती. गुरूवारी १० मार्च रोजी सायंकाळी महापौर जयश्री महाजन महाजन यांच्या आश्वासनानंतर अनुकंपधारकांना लिंबूपाणी देवून उपोषण मागे घेण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त वर्षा गायकवाड व मनपा अधिकारी उपस्थित होते.

 

याबाबत माहिती अशी की, महापालिकेच्या अंतर्गत अनुकंपा नुसार नियुक्ती करणे, प्रतिक्षासुचित जेष्ठ क्रमांकावर आहेत अश्यांना वारसांसाठी पद रिक्त ठेवून प्रतिक्षासुचितील पुढील कनिष्ठ अर्हता धारण करणाऱ्या वारसांना नियुक्ती देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी सोमवार ७ मार्चपासून अनुकंपाधारकांनी जळगाव महापालिकेसमोर आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली होती. १० मार्च रोजी उपोषणाच्या चौथ्या दिवशी महापौर जयश्री महाजन यांनी आयुक्त सतिष कुळकर्णी यांच्या सोबत चर्चा करून राज्य शासनाच्या नगरविकास विभागचे प्रधान सचिव यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आले आहे. यात प्रतिक्षासुचीतील ज्या कर्मचाऱ्यांवर आक्षेप आहे व जे प्रतिक्षासुचित जेष्ठ क्रमांकावर आहेत अश्यांना वारसांसाठी पद रिक्त ठेवून प्रतिक्षासुचितील पुढील कनिष्ठ अर्हता धारण करणाऱ्या वारसांना नियुक्ती देण्याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आलेले आहे. अशी माहिती महापौर जयश्री महाजन यांनी उपोषणकर्त्यांना दिली. दरम्यान लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल असे अश्वासन महापौर यांनी दिल्यानंतर उपोषणकर्ते गौरव पुराणिक, मुकेश पाटील, चेतन सैंदाणे, शुभम कोतकर, किरण देवरे, किरण नन्नवरे, गजानन मोरे, देवेंद सपकाळे, जावेद अली, फिरोज शेख यांना लिंबू पाणी देवून उपोषण सोडले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2114252195417227

 

Protected Content