जळगाव प्रतिनिधी । माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्व. राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अभिवादन करून उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सद्भावना दिनानिमित्त प्रतिज्ञा दिली.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी महसुल श्रीमती शुभांगी भारदे, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसिलदार सर्वसाधारण सुरेश थोरात, तहसिलदार महसुल पंकज लोखंडे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.