जिल्ह्यात आज 775 जणांना कोवीशिल्डची पहिली लस तर 414 जणांनी घेतली दुसरी लस

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील 21 लसीकरण केंद्रावर आज जिल्हाभरात एकुण  775 जणांना पहिली लस तर  414 जणांना दुसरी लस देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 23 हजार 208 जणांना कोवीशिल्डची पहिली लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात आता कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. आज 318 बाधित रूग्ण जिल्ह्यातून आढळून आलेत. शिवाय कोरानचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहेत.  

जिल्ह्यातील 21 कोवीड लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध करून देण्यात आले आहे.  आज दिवसभरात झालेले लसीकरण याप्रमाणे आहेत. जिल्हा रूग्णालय- 38, गोल्ड सीटी हॉस्पिटल-117, गाजरे हॉस्पिटल-48, ऑर्किड हॉस्पिटल-55, जैन हॉस्पिटल-0, जामनेर-51, चोपडा-12, मुक्ताईनगर-11, चाळीसगाव-49, पारोळा-4, भुसावळ-38, अमळनेर-9, पाचोरा-98, रावेर-44, यावल-35, भडगाव-7, बोदवड-2, एरंडोल-19, भुसावळ रेल्वे हॉस्पिटल-60, धरणगाव-32, एम.डी. भुसावळ-46 असे एकुण 775 जणांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली आहे. तर कोरोनाची दुसरी लस जिल्ह्यात आज 414 जणांना देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Protected Content