गाळेधारकांनी केला ३८ चेकद्वारे २ कोटी ६६ लाख रुपयांचा भरणा

WhatsApp Image 2019 09 16 at 7.15.58 PM

जळगाव, प्रतिनिधी | गाळेधारकांनी थकीत भाडे व मालमत्ता कराचा रकमेचा भरण्यास सुरुवात केली आहे. यात आज ३८ चेकद्वारे २ कोटी ६६ लाख रुपयांचा भरणा आयुक्त उदय टेकाळे यांच्याकडे सायंकाळी करण्यात आला आहे.

याप्रसंगी किरकोळ वसुलीचे अधीक्षक नरेंद्र चौधरी हेदेखील उपस्थित होते. यापूर्वी तीन गाळेधारकांनी ही चेकद्वारे रक्कम भरली आहे असे एकूण ४१ गाळेधारकांनी आतापर्यंत चेकद्वारे रक्कम भरली आहे. थकबाकीदार गाळेधारकांना महापालिकेतर्फे नोटीस बजावण्यात आलेेली आहे.  गाळेधारकांना थकबाकी भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आलेली असून या मदतीचा हात आतापर्यंत ४१ गाळेधारकांनी चेकद्वारे थकबाकी  भरली आहे.

Protected Content