यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने बाल संस्कार विद्या मंदिर, सिताबाई दामोदर देवकर स्कूल विद्या मंदिर, न्यू बचपन इंग्लिश स्कूल सरदार वल्लभभाई पटेल या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गोळ्या बिस्कीटे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना कार्यालयात हिंदुह्वदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण यावल जेष्ठ पत्रकार अरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना कार्यकर्ते शरद कोळी, माजी नगराध्यक्ष पप्पू जोशी, संतोष खर्चे, डॉ. विवेक अडकमोल, शिवसेना माजी तालुका अध्यक्ष कडू पाटील, सारंग बेहेडे, योगेश राजपूत, गौरव जोशी, मयुर खर्चे, आदिवासी सेनेचे हुसेन तडवी, प्रकाश वाघ, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील बारी, भुरा बारी सागर कोळी, योगेश चौधरी, सुभाष वाघ, किशोर श्रावगी, प्रविण लोणारी, योगेश पाटील, प्रकाश झोपे व मोठया संख्येने शिवसैनीक या प्रसंगी उपस्थित होते.