सावदा ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालय वार्षिक क्रीडा महोत्सव 2024-25 निमित्त २२ जानेवारी रोजी ‘क्रीडा विभाग तर्फे जिमखाना-डे व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला प्रसंगी सोहळा चे अध्यक्ष माननीय प्रा. मुरलीधर तोताराम फिरके – सचिव तापी परिसर विद्यामंडळ फैजपूर व प्रमुख पाहुणे रवींद्र नाईक- जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव हे उपस्थित होते.

या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य व विद्यापीठ व विभागीय स्तरीय वेटलिफ्टिंग, धनुर्विद्या, बेसबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कुस्ती, जुडो, बुद्धिबळ, शक्ती तोलन आणि मैदानी स्पर्धा अशा विविध खेळात विशेष कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंना, प्रथम,द्वितीय, तृतीय पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले. तसेच महाविद्यालयात होणारा विविध स्पर्धांसाठी व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र जळगाव, विद्यापीठाच्या संघात प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह आणि ट्रॅक-सूट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
प्रसंगी मंचावर संस्थेचे पदाधिकारी प्रा.नंदकुमार भंगाळे,संजय चौधरी, डॉ. पद्माकर पाटील, अधिसभा सदस्य कबचौउमवि, जळगाव, प्रशांत कोल्हे, जिमखाना समिती चेअरमन डॉ.ए.के पाटील, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद मारतळे, उपप्राचार्य डॉ. मनोहर सुरवाडे, डॉ.हरीश नेमाडे, डॉ.कल्पना पाटील, डॉ.एस.व्ही.जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.आर.बी. वघुळदे यांनी केले, सूत्रसंचालन कॅप्टन डॉ.राजेंद्र राजपूत यांनी व आभार प्रा. शिवाजी मगर, यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.राजेंद्र ठाकूर,शेखर महाजन,स्पोर्ट विभागाचे विद्यार्थी ओमकार रीतापुरे, सचिन भोई, अनिकेत बढे, प्रदीप पाचपांडे, जान्हवी जंगले, दिशा तायडे इतर विद्यार्थी, विद्यार्थीनीनी मोलाचे सहकार्य केले.