नांद्रा येथे सेवानिवृत्त जवानाचे जल्लोषात स्वागत

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा येथे नुककतेच सेवानिवृत्त झालेले जवान समाधान तावडे यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले.

नांद्रा येथील माजी सैनिक ह.भ.प.लोटन महाराज यांचा चिरंजीव आपल्या वडीलांचा सैन्यातील वारसा जतन करत राजस्थान येथुन आपली १७ वर्षाची देश सेवा करुन सेवानिवृत्त होऊन घरी परतले. याचे औचित्य साधून गावाच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यासाठी सर्व स्थरावरील मान्यवरांनी त्याच्या सेवापुर्तीच्या मिरवणूक व सत्कारासाठी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. प्रारंभी येथील छत्रपती शिवाजी महाराज्याच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन त्याच वाहनातून नांद्रा येथील बसस्थानक, महादेव मंदिर, श्रीपाद बाबा हाँल व नंतर घराच्या अंगणापर्यंत त्यांची मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी चाळीसगाव येथील माजी सैनिक विकास देवरे व आबासाहेब गरुड, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितिन तावडे, पंचायत समिती सभापती बन्सीलाल पाटील, ह.भ.प.लोटन दावजी पाटील, सरपंच शिवाजी तावडे, योगेश सुर्यवंशी, अनिल तावडे, विनोद तावडे, प्रा.यशवंत पवार, पंकज बाविस्कर, मातोश्री ग्रा.प.सदस्य निर्मलाबाई तावडे, साहेबराव तावडे,विशाल तावडे,बालू बाविस्कर ,पत्रकार राजेंद्र पाटील, माजी जि.प.सदस्य राजेंद्र साळुंखे यांच्या सह परीसरातील सैनिक ,माजी सैनिक ,ग्रामस्थ,नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाधान तावडे हे १८ एप्रिल २००२ रोजी भोपाळ येथे इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल इंजिनियर या विभागात भर्ती झाले.त्यांनी सैन्यात भोपाळ,कलकत्ता ,जम्मु,झासी,आसाम,मंबई आणि राजस्थान येथुन १७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. माजी सैनिक समाधान तावडे यांना दोन बहिणी व आई वडील असा परीवार आहे.मुलगा सुखरुप सेवानिवृत्त होऊन घरी आल्याने परीवाराच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. नांद्रा गावाला सैनिकी वारसा असल्यामुळे संपुर्ण गाव या भव्य मिरवणूक व सत्कार समारंभात उपस्थित होते.

सैन्यातील इंजिनियरींग विभागात अहोरात्र १७ वर्षे काम करून मी मातृभुमीत परतल्यावर आज माझ्या गावाने व सर्व मित्र नातेवाईकांनी माझी भव्य अशी मिरवणूक काढून जो सत्कार केला त्या बाबत मला आज फार मोठा आनंद झाला असल्याची भावना समाधान तावडे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

Add Comment

Protected Content