जामनेर येथे राष्ट्रीय कुटुंबलाभ योजनेअंतर्गत ३० लाभार्थ्याना धनादेश वाटप

जामनेर, प्रतिनिधी । राष्ट्रीय कुटुंबलाभ योजनेअंतर्गत तालुक्यातील सुमारे ३० लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार असे एकुण सहालाख रूपयांचे वाटप करण्यात आले आहे.  दि. १२ मे रोजी तहसील कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात मा. मंत्री तथा आ. गिरीश महाजन यांच्या हस्ते लाभार्थ्याना धनादेशाचे वाटप करण्यात आले होते.

 

याप्रसंगी तहसीलदार अरूण शेवाळे, नायब तहसीलदार सुभाष कुंभार, विलास पाटील, तुकाराम निकम, संगांयोचे शेख आदी उपस्थित होते. लाभार्थ्यामधे वंदना भाकडे (मेणगांव), कमल राऊत (बेटावद खुर्द), सुवर्णा पवार (कासली), मन्साराम पाटील (पाटखेडा), शोभाबाई तायडे (महुखेडा), सुमीत्रा कांबळे ,नंदाबाई कुयटे, सरला घोंगडे, (पहुर-कसबे), सलमा बी. पिंजारी (पहुरपेठ), सिमा जाधव (वाकोद), कौशल्याबाई जाधव (कापुसवाडी), सरला सोनवणे (मांडवे बुद्रुक), शोभाबाई नरवाडे (करमाड), जानकीबाई मोची (शेंदुर्णी), नंदाबाई तागवाले,आनंदा शिंदे (देवपिंप्री), दिलीप पाटील (पिंपळगाव-गोलाईत), जिजाबाई वडर, वंदनाबाई वडर (बेटावद बुद्रुक), उषाबाई देशमुख (पिंपळगाव बुद्रुक), कलाबाई राठोड (कुंभारी खुर्द), विजया सोनवणे (वाकी), सुनील भोई (सामरोद), रेहाना नासीर, सायराबी तडवी (फत्तेपुर), नंदा दांडगे (सोनारी), शोभाबाई पाटील (कुंभारी सिम), रेखाबाई झाल्टे (जामनेर) आदींचा समावेश होता.

 

मतदारसंघाचे माजी आमदार नारायण किसन पाटील यांचेही दरम्यानच्या काळात निधन झाले होते, त्यामुळे त्यांना शासनातर्फे देण्यात आलेले सांत्वनापर पत्र व स्मृतीचिन्ह मा. मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वारसाला देण्यात आले.

Protected Content