आशा सेविका व गट प्रवर्तकांच्या मागण्यांसाठी संजय गरुड यांना साकडे

शेंदूर्णी, प्रतिनिधी । आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या कामाचा विचार करून त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करावेत या मागणीसह इतर मागण्याचे निवेदन आशा सेविका व गट प्रवर्तक यांच्यातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड यांना देण्यात आले.

संघटनेतर्फे सततपणे आंदोलने करीत आहेत.परंतु त्यांच्या मागण्यांचा शासन गांभीर्याने विचार करायला तयार नाही. सप्टेंबर २०१९ मध्ये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी बेमुदत संप करत राज्यभर आंदोलने केली होती. परिणामी शासनाने आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात दरमहा दोन हजार रुपये वाढ करून दि.१६ सप्टेंबर २०१९ रोजी आदेशही काढला आहे. परंतु, सदरची वाढ वर्षे झाले तरी मिळाली नाही. या वाढीपासून गटप्रवर्तकांना शासनाने वंचित ठेवले आहे. आशा स्वयंसेविकांसह गटप्रवर्तक यांनाही पुर्वलक्षी प्रभावाने मानधनवाढ लागू करण्यात यावी. ३ जुलैपासून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सुमारे ७० हजार आशा स्वयंसेविका व ३५०० गटप्रवर्तक असहकार आंदोलन करणार आहेत. सदर आंदोलनाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रतिनिधी संजय गरूड यांना संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली आशा व गटप्रवर्तकांच्या शिष्टमंडळाने दिले . राजेशजी टोपे, मंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या बैठक घडवून आणण्याची विनंती केली. सदर विनंतीवरून संजय गरूड यांनी ना. मंत्री राजेश टोपेंशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आशा सेविकांच्या समस्या सांगितल्या असता आरोग्यमंत्री टोपे यांनी मानधनवाढीचा निर्णयावर कालच सही केल्याचे सांगितले आहे. शिष्टमंडळात,मुकेश मोहोळ, सविता कुमावत, ज्योती पाटील, हाजरा तडवी, रोहिणी गुजर ,जयश्री गावडे, दिपाली ओव्हाळ, वर्षा बारी आदींनी सहभाग घेतला.

Protected Content