बाप्पाच्या जाहिरातीवरून ‘रेड लेबल’ ट्रोल ; हिंदू विरोधाचा आरोप

redlabel 2 2

 

मुंबई (वृत्तसंस्था) ‘ब्रूक बॉण्ड रेड लेबल टी’ या ब्रँडच्या गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या गणेश चतुर्थीशी संबंधित जाहिरातीला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. या जाहिरातीत हिंदू-मुस्लीम ऐक्य दाखवण्याचा प्रयत्न कंपनीने केला असला तरी या जाहिरातीच्या माध्यमातून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

 

ही जाहिरात कंपनीने गेल्या वर्षी गणेश चतुर्थीच्या आधी प्रदर्शित केली होती, पण एका वर्षानंतर ती चर्चेत आहे आणि ट्विटरवर #BoycottRedLabel टॉप ट्रेंड होत आहे. या जाहिरातीत हिंदू-मुस्लीम ऐक्य दाखवण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. पण, अनेक नेटकऱ्यांना ही जाहिरात रुचलेली नाही. या जाहिरातीतून हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत. नेहमी हिंदूंनाच का शिकवण दिली जाते? अशाप्रकारचे ट्विट करत नेटकरी आपला राग व्यक्त करत आहेत.

 

एक तरुण गणपतीची मूर्ती खरेदी करण्यासाठी एका दुकानात जातो. त्याला एक मूर्ती आवडते सुद्धा. मात्र, हा मूर्तीकार विक्रेता मुसलमान आहे हे लक्षात आल्याने तो मूर्ती खरेदी करण्यास टाळाटाळ करतो.‘आज काही महत्त्वाचे काम आहे, मी उद्या येतो’, असे म्हणत तो ग्राहक तेथून जाण्याच्या प्रयत्नात असताना मूर्तीकार त्याला किमान चहा तरी प्यावा अशी विनंती करतो. म्हणून माघारी फिरलेल्या हिंदू ग्राहकाला हा विक्रेता, ‘निदान चहा तरी घेऊन जा’, अशी विनंती करतो. चहा पिताना मूर्तीकार म्हणतो, ‘नमाज पठण करणारे हात जर बाप्पाची मूर्ती सजवणार असतील तर आश्चर्य वाटणारच…’ त्यावर तुम्ही हेच काम करता का, असे ग्राहक विचारतो. त्यावर ही एक प्रकारची ईश्वरसेवा असल्याचे मूर्तीकार ग्राहकाला सांगतो. मूर्तीकाराच्या या बोलण्याने प्रभावित होऊन तो ग्राहक बाप्पाची मूर्ती लगेच खरेदी करण्यास तयार होतो, असे या जाहिरातीत दाखवण्यात आले आहे.

Protected Content