Home Cities जळगाव राजधानी एक्सप्रेसचे जळगाव स्थानकावर जल्लोषात स्वागत

राजधानी एक्सप्रेसचे जळगाव स्थानकावर जल्लोषात स्वागत

0
79

जळगाव प्रतिनिधी । मध्य रेल्वे मार्गावरून धावणार्‍या राजधानी एक्सप्रेसचे आज रात्री जळगाव रेल्वे स्थानकावर अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले.

मध्ये रेल्वेच्या मार्गावरून मुंबई ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस धावणार असल्याची अलीकडेच घोषणा करण्यात आली होती. आज या मार्गावरून पहिल्यांदा ही राजेशाही एक्सप्रेस गाडी धावली. नाशिक येथे या ट्रेनचे जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर जळगाव येथील रेल्वे स्थानकावरही राजधानीचे स्वागत करण्यात आले. माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह खासदार रक्षाताई खडसे, खासदार ए.टी. पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंदूलाल पटेल, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्जवला पाटील, डॉ. राजेंद्र फडके आदींसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जळगाव रेल्वे स्थानकावर राजधानी एक्सप्रेसचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी एक्सप्रेसचे ड्रायव्हर आणि गार्डचे स्वागत केले. तर खासदार रक्षाताई खडसे आणि ए.टी. पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून एक्सप्रेसला रवाना केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound