Home Cities अमळनेर ‘हर हर महादेव’च्या जयघोषात पाताळेश्वर मंदिरात ४१ फुटी त्रिशूलाची भव्य स्थापना

‘हर हर महादेव’च्या जयघोषात पाताळेश्वर मंदिरात ४१ फुटी त्रिशूलाची भव्य स्थापना

0
14


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोरी नदीच्या मध्यभागी वसलेल्या सुमारे २०० वर्षे जुन्या पाताळेश्वर महादेव मंदिरात ४१ फुटी भव्य त्रिशूलाची भक्तिमय वातावरणात स्थापना करण्यात आली. या धार्मिक सोहळ्यानिमित्त फर्ची रोड येथील मारोती मंदिरापासून पाताळेश्वर महादेव मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने आणि डीजेच्या तालावर निघालेल्या या शोभायात्रेमुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

ज्ञानेश्वर रामा लोहार, रा. पैलाड, अमळनेर यांच्या वतीने सेवाभावी भावनेतून हा ४१ फुटी भव्य त्रिशूल पाताळेश्वर महादेव मंदिरास अर्पण करण्यात आला. त्रिशूलाच्या स्थापनेनिमित्त मंदिर परिसरात विशेष धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. त्रिशूलाचे भव्य स्वरूप पाहण्यासाठी आणि स्थापना सोहळ्यात सहभागी होण्यासाठी परिसरातील असंख्य भाविकांनी उपस्थिती लावली. फर्ची रोड येथील मारोती मंदिरापासून सुरू झालेल्या शोभायात्रेत भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. डीजेच्या तालावर भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने शोभायात्रेला मोठ्या उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. शोभायात्रा पाताळेश्वर महादेव मंदिरात पोहोचल्यानंतर धार्मिक विधी आणि पूजाअर्चेनंतर ४१ फुटी त्रिशूलाची विधिवत स्थापना करण्यात आली. पैलाड, वाडी चौक, भोईवाडा तसेच अमळनेर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमाचा आनंद घेतला. महिला, पुरुष आणि भाविकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत पाताळेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांसाठी प्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

या धार्मिक उपक्रमासाठी प्रसाद माऊली ग्रुप आणि शिवशक्ती साउंड यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच सुभाष मामा पाटील, गुलाब बापू गुरव, संदीप शिंगणे, सोनू भोई, हर्षल भोई, रमेश भोई, सुनील कोळी, दिलीप कोळी आणि विजय भाऊ पाटील यांचे मंदिरासाठी वेळोवेळी लाइटिंग तसेच अन्य स्वरूपात सहकार्य मिळत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. पाताळेश्वर महादेव मंदिर हे बोरी नदीच्या मध्यभागी वसलेले सुमारे २०० वर्षे जुने धार्मिक स्थळ असल्याने या मंदिराला परिसरात विशेष धार्मिक महत्त्व आहे. अशा ऐतिहासिक मंदिरात ४१ फुटी भव्य त्रिशूलाची स्थापना झाल्याने मंदिराच्या धार्मिक वैभवात आणखी भर पडली आहे. त्रिशूलाच्या स्थापनेनंतर भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, या धार्मिक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound