धरणगाव येथील लाचखोर विस्तार अधिकारीसह ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

धरणगाव प्रतिनिधी । तक्रारदारला जादा वेतन दिले गेल्याने जादा रकमेची परतफेड करण्यासाठी जिल्हा परिषदेला अनुकूल अहवाल पाठविण्यासाठी २ हजाराची लाच स्विकारणाऱ्या धरणगाव ग्रामविस्तार अधिकारीसह ग्रामसेवकास लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. 

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील एका गावातील ग्रामपंचायतीत तक्रारदार हे शिपाई म्हणून नोकरीला आहे. तक्रारदार यांना सन २०१५-१६ वर्षात जादा वेतन दिले गेल्याने सदर जादार देण्यात आलेली रक्कमची परतफेड करण्यासाठी तक्रारदार यांना नोटीस आली. नोटीसीचा अनुकूल अहवाल जिल्हा परिषदेला सादर करण्यासाठी धरणगाव येथील विस्ताराधिकारी सुरेश शालिग्राम कठाळे (वय-५१) रा. गंगूबाई नगर, पारोळा आणि कंडारी बुद्रुक ग्रामसेवक कृष्णकांत राजाराम सपकाळे (वय-४५) रा. बोरोले नगर, चोपडा यांनी २ हजाराची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार आज सापळा रचून दोन्ही संशयित आरोपींना दोन हजाराची रक्कम घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. दोघांवर चोपडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Protected Content