महावितरणच्या विरोधात चोपड्यात शेतकर्‍यांचे धरणे आंदोलन

चोपडा प्रतिनिधी | महावितरणने शेतकर्‍यांची वीज जोडणी तोडण्याच्या सुरू केलेल्या कारवाईच्या विरोधात आज तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

याबाबत वृत्त असे की, आधी हंगाम हातातून जाण्याची भिती असतांना महावितरणने शेतकर्‍यांच्या विरूध्द कारवाई सुरू केली असून त्यांची वीज जोडणी तोडण्यात येत आहे. याच्या विरोधात आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस. बी.  पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या धरणे आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदार अनिल गावित,वीज मंडळचे उपअभियंता गायकवाड निलेश रासकर यांना देण्यात आले. एस.बी पाटील, डॉ रवींद्र निकम धनंजय पाटील,अमृत महाजन,हिम्मतराव पाटील यांनी आपल्या भाषणातून महावितरणच्या कारभारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

याप्रसंगी  पुंडलिक महाजन, प्रदीप , पाटील, प्रदीप पाटील,पंकज पाटील कांतीलाल पाटील, राजेन्द्र पाटील,हिम्मतराव पाटील, प्रविण गुजराथी, धनंजय पाटील,बापू खैरनार,अजित पाटील यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

Protected Content