नुकसानीचे पंचमाने करून शासनाने ताबडतोब भरपाई द्यावी – श्रीराम पाटील

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | अहीरवाडी परीसरात केळीचे भीषण नुकसान झाले असून शासनाने ताबडतोब या भागातील पंचमाने करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी उद्योजक श्रीराम पाटील यांनी केली.

यावेळी निरुड, पाडला परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. मंगळवारी रावेर तालुक्यातील विविध भागात झालेल्या वादळाच्या तडाख्याने केळी उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उद्योजक श्रीराम पाटील यांनी अहिरवाडी आणि निरूळ या भागातील शेतकऱ्यांची भेट घेवून त्यांचे सांत्वन करून मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी मनोज पाठक, संदीप सावळे, नागेश्वर पाटील, माजी सरपंच राहुल चौधरी, टी.बी.पाटील, प्रमोद पाटील, सुनील चौधरी, निलेश वारके, तुषार पाटील, जितेंद्र पाटील, सिद्धेश चौधरी उपस्थित होते.

Protected Content