शहरातील एका कंपनीवर सिलिंगची कारवाई

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग आढळून आल्याने महानगर पालिकेच्या आरोग्य विभाग व अतिक्रमण निर्मूलन विभाग यांनी संयुक्तरित्या शहरातील कंपनीवर सिलिंगची कारवाई केली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, “आज बुधवार, दि. १ जून रोजी दुपारी तीन वाजता आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या आदेशान्वये सहाय्यक आयुक्त व आरोग्य अधिकारी अभिजीत बाविस्कर यांचे नियंत्रणाखाली एमआयडीसी W-16 सेक्टरमधील हिंदुस्तान इंडस्ट्रीज येथील कंपनीवर अचानक आरोग्य विभाग व अतिक्रमण निर्मूलन विभाग यांनी संयुक्त कारवाई केली. या ठिकाणी ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग आढळून आल्यात

मात्र प्लास्टिक कॅरी बॅग या नर्सिंग आणि कृषी कामासाठी लागणाऱ्या आहेत. असे कंपनीच्या मूळ मालकांनी अधिकारी कर्मचारी वर्ग सांगितले. त्यांना सदर कॅरीबॅग वापरासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्राची व इतर कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी सदर मागणी कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याने या कंपनीवर सिलिंगची कारवाई करण्यात आली.”

कंपनीचे मूळ मालकासमक्ष सहा.आयुक्त व आरोग्य अधिकारी अभिजीत बाविस्कर यांनी हि कारवाई केली. याप्रसंगी CSI,SI  उल्हास इंगळे, श्री धांडे, श्री जितेंद्र किरंगे तसेच अतिक्रमण विभाग प्रमुख संजय ठाकूर, सतीश ठाकरे, नाना कोळी, संजय हरी पाटील, नितीन भालेराव, किशोर सोनवणे, शेखर ठाकूर, दीपक कोळी आदींची उपस्थिती होती.

Protected Content