शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारावे – रयत सेनेची मागणी

चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुंबईजवळ अरबी समुद्रात लवकरात लवकर शिवस्मारक उभारावे अशी मागणी रयत सेनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली असून तसे निवेदन तहसीलदार चाळीसगाव यांना देण्यात आले आहे.

युतीसरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. स्मारकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा साधारण ४०० फूट उंच पुतळा राम सुतार यांना तयार करण्यासाठी दोन वर्षे दोन हजार कामगारांसोबत शिल्पकार सुतार मेहनत घेऊन स्मारक तयार करणार होते.त्यांच्या दुष्टीकोनातून
शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याची रचना कशी असावी, छत्रपती शिवाजी महाराजांचे देशात अनेक पुतळे आहेत. यातील सुतार यांनी अनेक पुतळे तयार केले आहेत; मात्र अरबी समुद्रातील स्मारकामधील हा पुतळा म्हणजे देशाची एक वेगळी ओळख निर्माण करणारा ठरावा, आजपर्यंत देशात कुठेही नसेल. घोड्यावर बसलेला पुतळा जो डायनॅमिक असेल.

महाराष्ट्रातील शिवप्रेमींना या स्मारकापासुन प्रेरणा मिळेल आणि एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांची धडाडी, लढाऊ वृत्ती शौर्य या पुतळ्यातून सर्वांना प्रेरणा देणारी असावी यासाठी महाराजांच्या उपलब्ध साहित्याबरोबरच घोडेस्वार, महाराष्ट्र, राजस्थानातील घोडे यांचा खूप अभ्यास त्यांनी केला. असून त्यानंतर हा घोडा, त्याची चाल नेमकी कशी असावी याबाबत निर्णय घेण्यात आला.होता या पुतळ्यात लढाई जिंकून उधळलेला वारू बनवण्याचा प्रयत्न मूर्तीकार करणार होते. या विजयी मुद्रेने मुंबईची स्कायलाईनच बदलून जाणार होती. साधारण दोन वर्षात स्मारक साकारले जाणार होते.मात्र राज्य सरकारने आठ वर्ष होऊन देखील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारले नसल्यामुळे जनतेला फक्त आश्वासन दिले होते का असा प्रश्न तमाम शिवप्रेमी जनतेला पडला आहे.

शिंदे व भाजप सरकार हे रोज महापुरुषांचे विचार जनतेला सांगत आहेत. मात्र अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी सरकारला विसर पडल्याने सध्या सत्तेत असलेले शिंदे भाजप सरकारने अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लवकरात लवकर उभारण्यात यावे अशी मागणी तमाम शिवप्रेमी व रयत सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनांच्या प्रती पालकमंत्री जळगाव, खासदार जळगाव आमदार चाळीसगाव, जिल्हाधिकारी जळगाव यांना देण्यात आल्या आहेत.

निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश सहसंघटक ज्ञानेश्वर कोल्हे,प्रदेश कार्याध्यक्ष विजय पाटील,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड, जिल्हा अध्यक्ष संजय कापसे, शेतकरी सेना जिल्हाउपाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण, शेतकरी सेना तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, संजय कर्पे, विलास मराठे, तालुका संघटक संजय राठोड, मार्गदर्शक डी एस मराठे, मुकुंद पाटील, शहर अध्यक्ष छोटू अहिरे, शहर शिक्षक सेनेचे अध्यक्ष सचिन नागमोती, शहर उपाध्यक्ष प्रदीप मराठे, कार्याध्यक्ष दिपक देशमुख, कृष्णानगर शाखा अध्यक्ष व सरपंच मनोज चव्हाण, तांबोळे शाखा अध्यक्ष विजय पाटील तर रणधीर जाधव, रवींद्र देशमुख, पप्पू घुले, बाळू तांबटकर, भूषण पाटील, सुनील परदेशी, विजयसिंग कच्छवा, दत्तात्रय पाटील, गणेश गोसावी, किरण पाटील, भगवान पाटील, नानासाहेब पाटील, संदीप पाटील, कुलदीप पाटील यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे खुशाल मराठे,सचिन पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content