सिंधी कॉलनीत आढळला अनोळखी वृद्धाचा मृतदेह

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात एका ६५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत बुधवार २३ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील रिंग रोडवरील सिंधी कॉलनी परिसरात बुधवारी २३ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास एका ६५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. परिसरातील नागरिकांनी खाजगी रुग्णवाहिका बोलवून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयताची ओळख पटविण्याचे आवाहन एमआयडीसी पोलिसांनी केली आहे.

 

 

Protected Content