पिंपळगावसह परीसरात अवैधरित्या गुटख्याची विक्री

img 5b14b7d7f0570

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर, सातगाव डोंगरी, सातगाव, पिंप्री, शिंदाड या भागातून गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. एफडीएचे दुर्लक्ष आणि अन्न सुरक्षा मानद कायद्याची पायमल्ली होत असल्यामुळे राज्यात गुटखाबंदी असतानाही अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारवाया थांबल्यामुळे गुटखा विक्रेत्यांचे फावत आहे.

पाचोरा शहरातील नामवंत शिदी व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत आहे. येथील एफडीएच्या अधिकाऱ्यांमुळे गुटखा विक्रीचा अवैध व्यवसाय फोफावला आहे. शहरात गुटख्याचे व्यापारी यांनी पिपळगाव हरेश्ववर येथे व पाचोरा शहरात गोडावून मध्ये साठा करून रोज लाखो रुपयांचा गुटखा विक्री करीत आहेत. त्यांच्याकडूनच ग्रामीण भागातील किरकोळ व्यापारी गुटख्याची खरेदी करतात. त्यामुळे शहरात गुटखा विक्रीचे प्रमाण वाढलेले आहे.तरी या गोडावूनचे ठिकाण व गुटखा विक्री करणारे व्यापारीचे नावे लवकर उघडकीस होणार असून आहे, तरी या अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन व अन्न भेसळयुक्त अधिकारी यांनी गोपनीय माहिती घेऊन कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Add Comment

Protected Content