करंजी ग्रामपंचायतीत गैरकारभार : उपसरपंचासह सदस्यांचे आमरण उपोषण (व्हिडिओ)

जळगाव, संदीप होले । बोदवड तालुक्यातील करंजी येथील ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराची चौकशी होवून सरपंच व ग्रामसेविके विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी उपसरपंच व सदस्य जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण करत आहेत. 

 

उपोषणकर्ते उपसरपंच सविता विकास पाटील,  सदस्य  ज्योती शशिकांत पाटील,  उत्तम पंढरी सुरवाडे यांनी  लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना सांगितले की,   मौजे करंजीचे सरपंच जानकीराम देवराम पाटील व ग्रामसेविका  शिल्पा अंभोरे यांनी संगनमताने १४ वा वित्त आयोगाअंतर्गत निधीतून काही एक काम न करताच एका ठेकेदारास हाताशी धरून त्यांच्या नावे ६  ते साडे सहा लाख रूपये इतकी रक्कम परस्पर धनादेशाव्दारे बेकायदेशिररित्या वर्ग केलेली आहे.  तसेच ग्रामनिधी, पाणीपट्टी, दलित वस्ती सुधार योजना व १४ व्या वित्त आयोगाच्या निधीचा अफरातफर केलेली आहे. प्रत्यक्ष कामे न करता परस्पर रकमा काढलेल्या असून शासनाच्या रकमेचा अपहार सरपंच जानकीराम पाटील व ग्रामसेविका शिल्पा अंभोरे यांनी संगनमताने निधी हडप केलेला आहे. याबाबत उपसरपंच सविता विकास पाटील,  सदस्य  ज्योती शशिकांत पाटील,  उत्तम पंढरी सुरवाडे यांनी  दि. २१ जून २०२१ रोजी  गटविकास अधिकारी पंचायत समिती बोदवड, ता. बोदवड यांचेकडे तक्रार अर्ज सादर केलेला आहे. मात्र बरेच दिवस उलटूनही आमच्या अर्जावर कुठलीही चौकशी अथवा आवश्यक कारवाई अद्यापही करण्यात आलेली नाही याबाबत आम्ही गटविकास अधिकारी श्री. नागटिळक यांना विचारणा केली असता त्यांनी चौकशी करणेबाबत टाळाटाळ करण्याची भूमिका दिसून आली, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.  याप्रकरणी तात्काळ चौकशी करण्यात येवून सरपंच जानकीराम देवराम पाटील व ग्रामसेविका शिल्पा अंभोरे यांचेविरूध्द कठोर कारवाई व्हावी व अपहाराप्रकरणी सरपंच व ग्रामसेविका यांचेविरूध्द गुन्हे दाखल करण्यात यावे. याप्रकरणी सरपंच जानकीराम पाटील यांचेविरूध्द मुंबई ग्रा.पं. अधिनियम १९५८ चे कलम ३९(९) नुसार सदस्यत्व अपात्र करण्यात येवून ग्रामसेविका शिल्पा अंभोरे यांना निलंबित करण्यात यावे. 

 

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/545268243327336

 

Protected Content