यावलचे विश्रामगृह बनले अनैतिककृत्यांचा अड्डा

a54e4759 0131 45ef b6a9 4e079bd3f744

यावल (प्रतिनिधी) येथील सार्वजनीक बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृह हे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दारूड्यांचा व अनैतिककृत्य करणाऱ्यांचा अड्डा बनले आहे. याप्रकारांमुळे विश्रामगृहाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली आहे.

या संदर्भात अधिक वृत्त असे की, येथील सूतगिरणी मार्गावरील शासकीय व खाजगी आयटीआयजवळ असलेल्या शासकीय विश्रामगृहात गेल्या काही दिवसांपासून सुरक्षारक्षक नसल्याने तिथे परिसरातील दारुडे व अनैतिक कृत्य करणाऱ्यांचा वावर वाढला आहे. या शासकीय विश्रामगृहाच्या उघड्या पडलेल्या खोल्यांमुळे या लोकांचे चांगलेच फावले आहे. एकांतात असलेल्या या शासकीय विश्रामगृहाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेले शिपाई दिपक पाटील यांची कनिष्ठ लिपीक या पदावर बढती झाल्याने मागील १० महिन्यांपासुन हे पद रिक्त असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. विश्रामगृह हे रामभरोसे असल्याने या ठिकाणी गैरकृत्य करणाऱ्या मंडळींकडुन काही गुन्हा घडल्यास त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्नही त्यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

येथे दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी विश्रामगृहावर आरटीओच्या माध्यमातुन वाहन प्रशिक्षण व वाहनचालक परवाना देण्यासाठी शिबिर घेण्यात येते. या शिबिरासाठी ही विश्रामगृहाची जागा मिळावी म्हणुन वाहन परवाने मिळुन देण्याऱ्या दलालांकडून सार्वजनीक बांधकाम विभागाच्या कर्मचाराऱ्यांना चिरीमिरी देण्यात येत असल्याचीही चर्चा आहे. विश्रामगृहाचे संरक्षण व देखभाल करण्यासाठी सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी तत्काळ दखल घेवुन शिपाई नियुक्त करावा, अशीही मागणी नागरिक करीत आहेत.

Protected Content