राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे जळगावात आगमन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे एक दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर आले असून आज सकाळी त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले.

सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत आज जळगाव आणि भुसावळात विविध कार्यक्रम आयोजीत केले आहेत. ते प्रारंभी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या दीक्षांत समारंभाला हजेरी लावतील. यानंतर ते डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये आयोजीत कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते भुसावळ येथील रेल्वे ग्राऊंडवर नवीन ट्रॅकचे उदघाटन करणार आहेत. याप्रसंगी त्ो रेल्वे रूग्णालयास देखील भेट देणार आहेत. हे सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर ते विमानाने मुंबई येथे रवाना होणार आहेत.

दरम्यान, आज सकाळी विशेष विमानाने राज्यपालांचे जळगाव विमानतळावर स्वागत झाले.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी त्यांचे स्वागत केले.

Protected Content