कोरोना : विद्यापीठाने सर्व परीक्षेतून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी

अमळनेर प्रतिनिधी । देशावर आलेल्या कोरोना संकटामुळे आणि दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत जात असल्याने  सर्वच व्यवस्थापनावर परिणाम होत असल्याने एप्रिल मे मध्ये होणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्व परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना दिलासा देऊन पुढील वर्षाच्या वर्गात प्रवेश देण्यात यावा अशी मागणी विविध विद्यार्थी संघटना नेत्यांनी कुलगुरूंना ईमेलच्या माध्यमातून निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगरसचिव ऍड कुणाल पवार , महाराष्ट्र्र फार्मसी स्टुडंट कौन्सिल चे अध्यक्ष भूषण भदाणे , माजी सिनेट सदस्य अतुल कदमबांडे ,राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील , फार्मसी कौन्सिलचे नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष अमोल राणा पाटील ,जळगाव जिल्हाध्यक्ष महेश पाटील आदींनी कुलगुरूंना विनंती केली आहे की कोरोनामुळे विद्यापीठाच्या एप्रिल मे मध्ये होणाऱ्या परीक्षा नियोजनावर परिणाम झाला आहे विद्यापीठात राज्यातील आणि राज्याबाहेरील विद्यार्थी शिक्षण घेत असून परिस्थिती कधी नियंत्रणात येईल याची शास्वती नसल्याने पदवीधर शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षात प्रवेश द्यावा, द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना तृतीय वर्षात प्रवेश द्यावा, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याना पुढील वर्षात प्रवेश द्यावा आणि काही प्रोजेक्ट सबमिशन असेल तर ते मेल वर मागवून महाविद्यालयांनी त्याची गुणवत्ता ठरवून विदयार्थ्यांना दिलासा द्यावा तसेच कंत्राटी प्राध्यापक व नॉन टीचिंग कर्मचारी यांचे वेतन सुरू ठेवावे अशी मागणी मेल द्वारे कुलगुरूंना करण्यात आली आहे

Protected Content