यावल येथे शासकीय गोदामाच्या कामाला पुन्हा प्रारंभ

यावल ( प्रतिनिधी) येथील गेल्या चार वर्षापासुन बंद पडलेले शासकीय धान्य गोदामाचे काम अखेर सुरू झाले असुन धान्य साठवणीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यावल तहसील अतंर्गत येणाऱ्या स्वस्त धान्य मालाच्या साठवणी करीता गोदाम भाडे म्हणून राज्य शासनाच्या महसुल विभागास गेल्या अनेक वर्षापासुन महीन्याला चाळीस हजार रुपये मोजावे लागत होते.

 

या विषयाला राज्य शासनाने गांभिर्याने घेतल्याने युद्धपातळीवर कामास मंजुरी मिळवुन कामास सुरूवात करण्यात आली आहे. काम प्रगतीपथावर असतांना धान्य गोदामाच्या कामास विजमंडळाचे हाई हॉल्टेज प्रवाह करणाऱ्या विद्युत तारांचा अडथळा निर्माण झाल्याने काम बंद पडले होते. सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या या कामाला आता विद्युत तारांचा प्रश्न सुटल्याने प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. या शासकीय धान्य गोदामाला मागील चार वर्ष विलंब झाल्याने राज्याचे महसुल विभागास सुमारे २० लाख रुपये गोदाम भाडेपोटी मोजावे लागले आहेत. या सर्व बाबींना लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि विज मंडळाचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याची संतप्त भावना व्यक्त केली जात आहे.

Add Comment

Protected Content